स्थैर्य, सातारा, दि.११: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला असून त्यास मदत करणार्या एकावर व दोन महिलांवरही सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महेश सदानंद धुरी, सविता सदानंद धुरी दोघे रा. मानगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग आणि जयंती अमोल महालटकर, अमोल महालटकर अशी संशयितांची नावे आहेत.
संबंधित विवाहिता सातारा येथे राहण्यास असून फिर्यादीने तिला माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे सांगत नोव्हेंबर 2019 ते 4 जून 2021 या कालावधीत पीडितेवर बलात्कार केला. यानंतर तो त्याच्या मुळ गावी मानगाव, ता. सावंतवाडी येथ निघून गेला. यानंतर पीडित महिलेने त्यास फोन करून सातारा येथे कोर्ट मॅरेज करूया, असे सांगितले असता त्याने लग्नास नकार दिला व माझ्या आशेवर बसू नको, असे सांगितले. यानंतर पिडितेने सातारा शहर पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.