

स्थैर्य, सातारा, दि. 6 : वर्ये, ता. सातारा विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येप्रकरणी पतीसह सासरच्या तिघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी विवाहितेचा भाऊ राजकुमार कलमदाणे रा. शरदनगर, चिखली (पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बहिण मंजुषा हिचा नोव्हेंबर 2017 मध्ये मंजुलकुमार माणिक जाधव रा. वर्ये, ता. सातारा याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर सासरी आलेल्या मंजुषाचा जाचहाट सुरू झाला. पती मंजुलकुमार तसेच अनिता माणिक जाधव आणि मृदूला माणिक जाधव यांनी मंजुषाला तुला घरकाम येत नाही, सकाळी लवकर उठत नाही तसेच मुलाचे पुण्यातील दुसर्या मुलीशी लग्न करणार असल्याचे सांगून तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. वेळोवेळी उपाशी ठेवून व मारहाण करून तिला जगणे असह्य करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार सातारा तालुका पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

