दैनिक स्थैर्य । दि.२० नोव्हेंबर २०२१ । सातारा । येथील पेढ्याचे व्यवसायिक प्रशांत मोदी यांना अज्ञाताने इंटरनॅशनल कॉल करुन तसेच मेसेज करुन ३0 लाख रुपये देण्यासाठी धमकी दिल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दि. ७ ते १५ नोव्हेबर या कालावधीत धमकी दिली आहे. दरम्यान, पैसे न दिल्यास बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.