दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑक्टोबर २०२१ | शिरवळ | शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका गावातील विवाहिता पती व नातेवाईकांसोबत फोटो काढत असताना विवाहितेचा हात धरीत मला तुझ्यासोबत सेल्फी काढायचा आहे, असे म्हणत विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध विनयभंग सहित अनुसूचित जाती आणि अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गंत (अँट्रासिटी) शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिल शिवाजी आवाळे असे गुन्हा दखल झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका गावामध्ये 33 वर्षीय विवाहिता हि वाढदिवस असल्याने वाढदिवसाचे घरगुती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी संबंधित 33 वर्षीय विवाहिता हि आपला पती व नातेवाईकांसोबत फोटो काढत असताना त्याठिकाणी अनिल आवाळे हा आला. दरम्यान,अनिल आवाळे याने संबंधित विवाहितेचा हात धरीत मला तुझ्यासोबत सेल्फी काढायचा आहे असे म्हणत विनयभंग केला. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून शिरवळ पोलीस स्टेशनला विनयभंगासहित अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गंत (अँट्रासिटी)गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास प्रभारी फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश देशमुख हे करीत आहे.