
दैनिक स्थैर्य । दि. १ जुलै २०२१ । सातारा । पानमळेवाडी वर्ये, ता. सातारा येथे दुखापत करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 रोजी 2.15 वाजण्याच्या सुमारास पानमळेवाडी, वर्ये, ता. सातारा गावच्या हद्दीत तेथीलच प्रफुल्ल पांडुरंग शिंदे, मयुर पांडुरंग शिंदे यांनी लक्ष्मण अनिल अवसरे वय 24, रा. पानमळेवाडी व त्याचा मित्र ऋषिकेश सतीश जावळे हे दोघे जात असताना गाडीचे फोटो काढल्याचा संशय घेऊन, तुम्ही बाहेरून इथे रहायला आला आहात, तुमची इथे राहण्याची लायकी नाही. असे म्हणून त्यांना दुखापत करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.