
दैनिक स्थैर्य । दि. ०१ मार्च २०२२ । सातारा । महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी निलेश आबा बोभाटे याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 28 रोजी घडली आहे. याप्रकरणी पिडीत महिलेच्या कुटुंबियांनी विचारणा केल्यानंतर संशयिताने शिवीगाळ, दमदाटी केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.