
स्थैर्य, सातारा, दि. १२ : बाबर चौक करंजे पेठ सातारा येथे संदिप मारूती शिंदे (वय 43 वर्षे, रा.घर नं. 59 / ब जंगीवाडा सातारा) हा त्याच्या अँपे रिक्षा क्र. MH–11–CJ-1574 या गाडीमधुन भाजी विक्री करीत होता. भाजी खरेदीसाठी त्याठिकाणी लोकांची गर्दी जमा झाली त्यामुळे नियमांच उल्लंघन झाले म्हणून त्याच्यावर भा.द.वि .188 , 269 , 270 , आपत्ती व्यवस्थापन अधि 2005 कलम 51 (ब), महाराष्ट्र कोविड अधिनियम 11 प्रमाणे शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.