दैनिक स्थैर्य । दि. ३० जुलै २०२२ । सातारा । गळ्यातील गंठण चोरी केल्याप्रकरणी एका महिलेवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 जुलै रोजी सकाळी साडेअकरा ते अकरा पन्नास वाजण्याच्या दरम्यान पूजा सचिन यादव राहणार कालेटेक, तालुका कराड हिने 80 हजार रुपये किंमतीचे दोन तोळे वजनाचे गळ्यातील गंठण राहत्या घरातून चोरी केले असल्याची फिर्याद पौर्णिमा विकास लादे वय 39, रा. बुधवार पेठ, कराड यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार देसाई करीत आहेत.