एकाला जखमी केल्याप्रकरणी अज्ञात कारचालकावर गुन्हा


दैनिक स्थैर्य । दि. ०७ ऑगस्ट २०२२ । सातारा ।  म्हसवे, ता. सातारा गावच्या हद्दीत स्विफ्ट कारमधील अज्ञात चालकाने दुचाकीला धडक देऊन दुचाकीस्वाराला जखमी केल्याप्रकरणी अज्ञात कारचालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 जुलै रोजी 12.30 ते 12.45 वाजण्याच्या सुमारास म्हसवे, ता. सातारा गावच्या हद्दीत पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर स्विफ्ट कार क्र. एम. एच. 11 सीजी 4873 वरील अज्ञात चालकाने कार भरगाव वेगाने चालवून दुचाकी क्रमांक एम.एच. 11 सीएस 9714 ला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक आनंदराव सोपान सावंत, वय 69, रा. आनंदवन अपार्टमेंट शेजारी, गोडोली, ता. सातारा यांना जखमी करून त्यांच्या गाडीचे नुकसान केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!