
दैनिक स्थैर्य । दि. ०५ जुलै २०२२ । खंडाळा । शिरवळ व शिंदेवाडी परिसरामध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या दोन जणांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, शिरवळ ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये पोलीस अंमलदार प्रशांत वाघमारे व सचिन वीर हे पेट्रोलिंग करीत असताना सटवाई कॉलनी येथील ओढ्याच्या पुलावर राजू नंदकुमार साहू (वय ४२,सध्या रा.शिरवळ ता.खंडाळा मूळ रा.मस्तूरी राज्य छत्तीसगढ) हा चोरी करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरित्या फिरत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी राजू साहू याची अंगझडती घेतली असता त्याच्या खिश्यामधून चाव्यांचा जुडगा व स्क्रू ड्राइवर मिळून आले. तर शिंदेवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल बारेला व पोलीस अंमलदार मंगेश मोझर हे पेट्रोलिंग करीत असताना रहीम निहाम्मद शेख (वय ३५,सध्या रा.शिरवळ ता.खंडाळा,मूळ रा.बावनखोली जि.हिंगोली) हा संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला. यावेळी संबंधितांकडे स्क्रू ड्राइवर मळून आला याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रशांत वाघमारे व मंगेश मोझर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजू साहू व रहीम शेख यांच्याविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दखल करण्यात आला आहे.
या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल बारेला,पोलीस अंमलदार आप्पासाहेब कोलवडकर हे करीत आहे.