एकास दुखापत केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑगस्ट २०२२ । सातारा । गुरे चारण्याच्या कारणावरून एकास दुखापत केल्याप्रकरणी दोघांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 4 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता संतोष बबन मगर हे ढोरोशी, तालुका पाटण गावच्या हद्दीत म्हैस चारत असताना त्याच गावातील दिलीप चिंगू मगर आणि साहेबराव चंगू मगर हे तेथे आले व त्यांनी संतोष मगर यांना तू इथे गुरे चारायची नाही व थांबायचे नाही तसेच या रस्त्याने जायचे नाही असे म्हटले असता संतोष मगर यांनी ही जमीन माझी आहे मी या ठिकाणी गुरे चारणार, असे म्हटल्याचा राग मनात धरून दगडाने व हातातील खुरप्यांनी संतोष मगर यांना मारहाण केली. या घटनेची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस हवालदार निकम करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!