दैनिक स्थैर्य । दि. ०२ जानेवारी २०२२ । सातारा । वीज वितरण कंपनीच्या परवानगीशिवाय परस्पर आकडा टाकून विजेची चोरी करणाऱ्या दोघांवर दोन स्वतंत्र घटनांमध्ये म्हसवड आणि दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पहिल्या घटनेमध्ये शंकर बाबुराव काटकर वय 65 राहणार कुकुडवाड तालुका माण यांनी स्वतःच्या फायद्या करता येथील ढाब्याच्या शेजारी जाणाऱ्या इलेक्ट्रिक पोर वरील लघुउदवाहिनीवर काळ्या रंगाच्या वायरचा आकडा टाकून स्वतःच्या ढाब्यात अनधिकृत वीज वापरली महावितरण कंपनीचे मागील चार महिन्याचे 632 युनिट चे वीज बिल 15740 रुपये झाले आणि तडजोड रक्कम दहा हजार असे 25 हजार 740 रुपयांचे मोफत विजेचा वापर केला म्हणून त्यांच्यावर तक्रार दाखल झाली आहे अध्याप त्यांना अटक करण्यात आलेले नाही पोलीस हवालदार खाडे तपास करत आहेत.
दहिवडी येथे मौजे शिंदी तालुका माण येथील विजय विनायक भोसले यांच्या घरासमोरील विद्युत पोल वरून वायरचा आकडा टाकून त्यांनी वीज वापरताना आढळून आले धीरज कुमार आनंद पवार यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही हवालदार एन एम कोळेकर तपास करत आहेत.