दांपत्यास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा


दैनिक स्थैर्य । दि. ३० नोव्हेंबर २०२२ । सातारा । दांपत्यास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 नोव्हेंबर रोजी लहान मुलांच्या झालेल्या भांडणाच्या कारणावरून मनीषादेवी जितेंद्र गुप्ता आणि जितेंद्र गुप्ता रा. केसरकर पेठ, सातारा यांनी तेथीलच नीलमदेवी जितेंद्र सहा यांना रॉडने कपाळावर मारून जखमी केले. तसेच नीलम देवी यांचे पती भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही हाताने मारहाण करून शिवीगाळ केली आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस नाईक खलिफा करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!