दैनिक स्थैर्य । दि. १६ नोव्हेम्बर २०२२ । सातारा । विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती कनाद, सासरे आनंदीदास, दीर आदित्य राहटीकर (सर्व रा. डोंबिवली, मुंबई ) यांच्यासह एका महिलेविरुध्द सुखदा कनाद राहतीकर (वय 28, सध्या रा. सदरबझार, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. एक वर्षापासून सासरच्या मंडळींनी मानसिक त्रास दिला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.