
स्थैर्य, सातारा, दि.१: विवाहितेचा मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासू आणि जाऊ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रवीण चंदुलाला कांबळे वय 36, जाऊ चित्रा किसन कांबळे आणि सासू शंकुतला भिसे अशी संशयीतांची नावे आहेत. संशयीतांनी मनीषा प्रवीण कांबळे वय 33 या विवाहितेचा मानसिक छळ केला. तसेच तिला मरून जा असे म्हणून आत्महत्येस प्रवृत्त केला. याप्रकरणी कुसूम विलास भिसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिन्ही संशयीतांवर गुन्हा दाखल झाला असून तपास सपोनि शितोळे करत आहेत.