दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑकटोबर २०२२ । सातारा । रेशनिंग दुकानदारास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 26 ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नागेश निवृत्ती काळंगे हे रेशनिंग दुकानदार दीपावलीच्या आनंद शिधा वाटपाचे काम करत असताना अरविंद ओव्हाळ यांच्या मोबाईल वरून फोन आला व त्यांनी तुमच्या विषयी महिलांच्या तक्रारी आहेत, असे सांगितले. यावर नागेश काळंगे यांनी ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांना घेऊन या, असे सांगितले. त्यानंतर संतोष ओव्हाळ रा. प्रतापसिंह नगर त्याच्यासोबत आणखी दोघांना घेऊन आला. या तिघांनी काळंगे यांना लाकडी काठीने मारहाण केली. तसेच तेथील शिधा वाटपाच्या पैशांमधील सतराशे रुपये चोरून नेले. याचबरोबर काळंगे यांना शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे करीत आहेत.