स्थैर्य, सातारा, दि. १७ : कण्हेर पुनर्वसनाबाबतचा आदेश पोकळ असल्याबाबतचा अहवाल तहसीलदारांना देण्याच्या बदल्यात 20 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 10 हजार स्वीकारल्याप्रकरणी सातारा तालुक्यातील तासगाव सर्कलच्या मंडलाधिकार्यावर लाचप्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी, लोकसेवक संतोष शिवाजी झनकर वय 37 रा. गुरूवार पेठ सातारा हा तासगांव ता. सातारा येथे मंडलाधिकारी आहे. तक्रारदाराचे त्याच्या कार्यालयाशी संबंधित उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांच्याकडील दि. 27/09/0211। क्र. पुनर्व/कण्हेर/ एसआर – 12 प्रमाणेचा आदेश पोकळ असल्याचा अहवाल तहसिलदार यांना द्यायचा होता. या कामाच्या मोबदल्यात झनकर याने तक्रारदाराकडे 20 हजार लाचेची मागणी करून तडजोडीअंती 10 हजाराची लाच मागणी स्वीकारण्यास तयार झाला. याबाबत तक्रारदाराने अँटिकरप्पशनला तक्रार केल्यानंतर दि 15 मार्च रोजी पडताळणी व सापळा कारवाई करण्यात आली. यावेळी लोकसेवक झनकरने शकुनी गणपती मंदीराजवळील पटांगणामध्ये येथे 7.55 च्या सुमारास रक्कम स्विकारली. याप्रकरणी त्याच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.