महिला पोलीसाला जाचहाट करणाऱ्या साताऱ्यातील सहा जणांवर गुन्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१२ मे २०२२ । सातारा । पुणे शहरात महिला फौजदार म्हणून कर्तव्य बजावत असलेल्या प्रियांका निकम यांनी पतीसह एकूण ६ जणांवर जाचहट, फसवणूक व गळा दाबल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस अधिकार्‍याच्या या तक्रारीने खळबळ उडाली आहे.

पती प्रशांत शिवाजी शिंदे, सासू मंगल शिंदे (दोघे रा. चिंचणी ता. सातारा), नणंद हेमा भोसले, गणेश भोसले (दोघे रा. सैदापर ता. सातारा), नणंद दिपाली जाधव, गणेश जाधव (दोघे रा.पिंपरी, पुणे) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी प्रियांका सत्यवान निकम (वय ३१, सध्या रा. कोंढवा, पुणे, मूळ रा. करंदी ता. जावली जि. सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, संशयित आरोपी सर्वांनी तक्रारदार यांना मानसिक, शारीरिक त्रास देवून छळ केला. २०१४ व २०१९ मध्ये पतीसह सासू व नणंद हेमा यांनी तक्रारदार प्रियांका यांच्या इच्छेविरुध्द जबरदस्तीने गर्भपात केला. तसेच दोन्ही नणंदांनी मारहाण करत एकदा गळा दाबला.


Back to top button
Don`t copy text!