स्थैर्य, सातारा, दि.२९ : कोरोनामुळे रात्री नऊ वाजता हॉटेल बंद करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश असताना रात्री साडेअकरापर्यंत हॉटेल सुरू ठेवणार्या हॉटेल मालक व कामगार अशा सहाजणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामर्गावर वाढे फाट्यावर असलेले हॉटेल निसर्ग हे दि. 26 रोजी रात्री पावणेबारापर्यंत सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी हॉटेल मालक राजेंद्र नलवडे यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर वाढे फाटा येथीलच हॉटेल शंभूराज कंदी पेढे दुकान, हे रात्री दीडपर्यंत सुरू होते. याप्रकरणी पोलिसांनी युवराज नलवडे व कामगार नईम रमजान सय्यद, सोहेल अलीम शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच वाढे फाटा परिसरातील हॉटेल उमीवूज हे रात्री पावणेबारापर्यंत सुरू होते. त्यामुळे पोलिसांनी हॉटेल मालक व मॅनेजर सुनील पांडुरंग जाधव (वय 32, रा. जयमल्हार, सोसायटी, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल केला.