
स्थैर्य, सातारा, दि.२३: कोवीडच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशाचा भंग करून जिल्हा परिषदेवर मोर्चा काढल्याप्रकरणी सुमारे दीडशे महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, दि. 21 रोजी जिल्हापरिषदेच्या समोर आनंदी माणिक अवघडे, माणिक विष्णू अवघडे दोघे रा. सदर बझार सातारा, स्वाती जगन्नाथ भिवरकर रा. अलगुडेवाडी, ता. फलटण, पल्लवी गणपत नलवडे रा. अळजापूर, ता. फलटण, जयश्री बाळासो काळभोर, रा. पाली, ता. कराड, सविता राजेंद्र थोरात रा. ओंड, ता. कराड, सावित्रा भिमराव भोसले रा. शिवाजीनगर, ता. खंडाळा, लक्ष्मी अजित मोरे रा. दुदुस्करवाडी, ता. जावली व अन्यजण तसेच अज्ञात दिडशे आदींनी मोर्चा काढला. कोवीडचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असूनही मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी वरील आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.