खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या खाजगी सावकारांवर गुन्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ फेब्रुवारी २०२२ । फलटण । खाजगी सावकारी मधून लिहून घेतलेल्या जमिनीचा ताबा दिला नाही, म्हणून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन शिवीगाळ करणाऱ्या खाजगी सावकार विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादि कैलास दादासो मिंड (रा. टाकळवाडा ता. फलटण) यांनी सन 2014 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये फलटण येथील सोमवार पेठेतील खाजगी सावकार भगवान नामदेव मोहिते यांच्याकडून भाचीच्या लग्नाकरिता पैशाची आवश्यकता असल्याने पैशाची मागणी केली होती. खाजगी सावकार भगवान मोहिते याने फिर्यादी मिंड यांच्याकडून जमीन लिहून द्यावी लागेल असे म्हणून साठेखत व दस्त करून घेतला त्याबदल्यात फिर्यादिस 2 लाख 10 हजार रुपये रोख रक्कम साठेखत दस्त व कूळ कायद्याच्या खर्चापोटी लावली होती. फिर्यादी यांनी नोव्हेंबर 2021 पर्यंत 5% टक्के व्याज दराने दरमहा 10 हजार रुपये रक्कम नुसार आतापर्यंत 6 लाख रुपये व्याजापोटी दिले होते. यानंतर फिर्यादी मिंड यांनी सदर जमिनीचा ताबा दिला नाही म्हणून फिर्यादीस खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन शिवीगाळ करीत असल्याची फिर्याद कैलास दादासो मिंड यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार खाजगी सावकार भगवान नामदेव मोहिते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहे.


Back to top button
Don`t copy text!