स्थैर्य, सातारा, दि. 22 : पहिले लग्न झाले असताना दुसरे लग्न करून दुस्रया पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी बबनराव भोसले (रा. सातारा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. फेब्रुवारी ते मे या कालावधीत हा प्रकार घडला असून फसवणूक करून दुसरे लग्न केल्याचा आरोप यावेळी तक्रारीत करण्यात आला आहे. अरुणा शिवाजी भोसले (वय 29, सध्या रा. यशोदानगर सातारा) यांनी याबाबतची तक्रार दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार यांनी संशयित आरोपी सपोनि शिवाजी भोसले यांच्याशी विवाह केला आहे. विवाह केल्यानंतर त्याचे यापूर्वीच लग्न झाले असल्याची माहिती समोर आली. याबाबत पत्नी अरुणा यांनी विचारणा केली असता सपोनि शिवाजी भोसले यांनी तक्रार यांना शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच तू आपल्या लग्नाबद्दल माझ्या पहिल्या पत्नीला सांगायचे नाही, असे म्हणून मारहाण करून जाचहाट केला.याबाबत वेळोवेळी विचारणा केल्यानंतर ही मारहाणीची घटना होत असल्याने अखेर तक्रारदार अरुणा भोसले यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकाराने शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी अवाक झाले. याबाबत पुरावा मागितला असता तक्रार यांनी विवाह संबंधी पुरावा इतर माहिती सादर केली. कागदपत्रे पाहून अखेर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. सपोनि शिवाजी भोसले यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, पोलिस अधिकायांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर याबाबत शहर पोलिस ठाण्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता या गंभीर गुह्यांची माहिती लपविण्याचा प्रयत्न केला गेला.