नागठाणेतील एकाविरोधात गुन्हा


दैनिक स्थैर्य । दि. ४ जुलै २०२१ । नागठाणे । गणेशवाडी (ता.सातारा) येथील वीज मंडळाच्या उपकेंद्राच्या इमारतीच्या आवारात येऊन आरडा-ओरडा करून दंगा केल्याप्रकरणी एकाविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुखदेव हणमंत मोहिते (वय 35, रा. नागठाणे, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी सुखदेव मोहिते हा दारू पिऊन वीज मंडळाच्या इमारतीच्या आवारात आला. तेथे त्याने जोरजोरात आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग केला. यावेळी उपस्थित कर्मचार्‍यांनाही दमदाटी केली. वायरमन अंकुश रामचंद्र ढाणे यांनी याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास हवालदार राजू शिंदे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!