स्थैर्य, लोणंद, दि. 20 : जबरी संभोग करण्याच्या उद्देशाने खंडाळा येथील लॉजवर काढलेले फोटो व्हायरल करण्याची व मुलांना व नवर्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अमृत बाळासाहेब धायगुडे (रा. सुखेड, ता. खंडाळा) याच्यावर लोणंद पोलीस स्टेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुखेड गावच्या हद्दीत तरी सुमारे दोन वर्षांपासून अमृत बाळासाहेब धायगुडे याने गावच्या हद्दीत असलेले सुतारकी नावाच्या शिवारात घरात तसेच खंडाळा येथील लॉजवर काढलेले फोटो इतरांना पाठविण्याची धमकी देऊन वेळोवेळी जबरदस्तीने संभोग केला. तसेच घडलेला प्रकार तुझ्या नवर्याला सांगितला तर नवर्याला व मुलांना जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिल्याची फिर्याद पीडित महिलेने लोणंद पोलीस स्टेशनली दिली. या घटनेचा तपास लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी करीत आहेत.