
स्थैर्य,कोरेगाव, दि. 24 : धामणेर (ता. कोरेगांव) येथे अज्ञात वाहनाने विनापरवाना आल्यावरुन चार जणांवर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद तलाठी दीपक तुकाराम गोडसे यांनी दिली.
विकी उर्फ निखिल प्रकाश बाबर, मालन प्रकाश बाबर (रा. धामणेर, ता.कोरेगाव) तर सीमा अनिल चौगुले, रेखा सुनील माळवे (रा. कळवा, ठाणे) या सर्वांनी कोविड – 19 या विषाणू रोगाचा प्रादुर्भाव व संसर्ग होईल व जिवीतहानी होईल हे माहीत असताना सुध्दा विनापरवाना जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लघंन करुन पोलिसांची नजर चुकवून अज्ञात वाहनाने आपल्या गावी धामणेर येथे आलेले आहेत. तसेच जिल्हाधिकार्यांचा जिल्हा प्रवेश बंदी बाबतचा आदेश असताना करोना ना सारख्या साथीच्या रोगाचा फैलाव या प्रवासामुळे होतो हे माहित असताना सुध्दा सातारा जिल्ह्यात बेकायदेशीर प्रवेश करुन लोकसेवकाच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस हवालदार के.जी.गोसावी हे करीत आहेत.