दैनिक स्थैर्य । दि. २८ मे २०२२ । सातारा । दवाखान्याच्या पायरीवर बसल्यानंतर काय झाले, असे म्हटल्याच्या कारणावरुन तरुणाला मारहाण केली. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना गुरुवार, दि. २६ मे रोजी राधिका चौक, सातारा या परिसरात घडली.
याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी आकाश राकेश बल्लाळ वय २८, रा. बुधवार पेठ, सातारा याने तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर युवराज मारवाडी (पूर्ण नाव नाही, रा. प्रतापगंज पेठ, सातारा), विक्रांत जाधव, श्रेयस भोसले (पूर्ण नाव नाही) आणि साहील समीर कच्छी रा. मोळाचा ओढा, सातारा यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. गुरुवारी मारहाणीची ही घटना घडली होती. दवाखान्याच्या पायरीवर बसलो असताना युवराज मारवाडी याने पाय आपटून दंड थोपटला. त्यामुळे काय झाले, काही प्रॉब्लेम आहे का ? असे विचारल्याने राग धरुन मला मारहाण करण्यात आली. तसचे डोक्यात दगड घालून जखमी करण्यात आले, असे फिर्यादीने तक्रारीत म्हटले, असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबतचा तपास शाहूपुरी पोलीस करीत आहेत.