मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालकावर गुन्हा


दैनिक स्थैर्य । दि. ३१ ऑक्टोबर २०२२ । सातारा । एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 29 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान रहिमतपूर- सातारा रस्त्यावर दत्तात्रय राजेंद्र साळुंखे वय 32 रा. अंभेरी ता. कोरेगाव हे त्यांचे सासरे शरद रामचंद्र बर्गे वय 55, रा. कोरेगाव, ता. कोरेगाव यांच्यासोबत तवेरा गाडी क्रमांक एम एच 11 एके 4988 मधून निघाले होते. यावेळी केशर ढाब्यासमोर लघुशंकेसाठी गाडी थांबवली. यानंतर त्यांचे सासरे शरद बर्गे हे लघुशंकेसाठी गेले होते. ते परत येत असताना सातारा बाजूकडे जाणाऱ्या टाटा कंपनीच्या इंडिगो गाडी क्रमांक एमएच 11 (मधली अक्षरे माहित नाहीत) 8886 वरील चालकाने गाडी भरवेगात, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून शरद बर्गे यांना रस्ता क्रॉस करीत असताना धडक दिली. यानंतर हा कारचालक मदत न करता तिथून निघून गेला आहे. या अपघातात शरद बर्गे यांचा मृत्यू झाला असल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक फरांदे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!