वेळे येथील अपघात प्रकरणी बस चालकावर गुन्हा


दैनिक स्थैर्य । दि. १५ सप्टेंबर २०२२ । सातारा । वेळे येथे दि. 12 रोजी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास पायी रस्त्या ओलाडणाऱ्या नारायण नामदेव जगताप वय 55, रा. रणदुल्लाबाद यांना एसटी बसने धडक दिली होती. त्या अपघात जगताप यांचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी एसटी बस चालक संतोष रत्नाकर गरवारे रा. हिंगणे, ता. खटाव याच्यावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्या बस चालकास अटक करण्यात आलेली नाही. भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमित जाधव याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचे सासरे नारायण नामदेव जगताप हे वेळे येथे दि. 12 रोजी 7.30 वाजण्याच्या सुमारास महामार्ग ओलांडत होते. त्यावेळी एसटी बस क्रमांक एम.एच.06एस.8970 ने धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. एसटी चालक संतोष गरवारे याच्यावर गुन्हा दाखल केला असून अद्याप त्यास अटक केली नाही.


Back to top button
Don`t copy text!