स्थैर्य, सातारा, दि.१४: कोरोना महामारीत जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन करत पानटपरी सुरु ठेवल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्निल हेगडे असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, स्वप्निल ललित हेगडे (वय 20, रा. शिर्के शाळा ओढ्याजवळ, गुरुवार पेठ, सातारा) याची मंगळवार पेठेतील राजवाडा चौकात पानटपरी आहे. शनिवार, दि. 12 रोजी शाहूपुरी पोलीस पेट्रोलिंग करत असताना स्वप्निल हेगडे याची पानटपरी सुरु असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पोलीस शिपाई पंकज मोहिते यांनी तक्रार दिल्यानंतर स्वप्निल हेगडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक फौजदार एस. एस. तवर करत आहेत.