सोशल मिडियावर युवतीची बदनामी करणाऱ्या युवकावर गुन्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ फेब्रुवारी २०२२ । सातारा । सातारा शहर परिसरात राहणाऱ्या युवतीचे फोटो इन्‍स्‍टाग्रामवर व्‍हायरल करत तिची बदनामी केल्‍याप्रकरणी नांदलापूर (ता. कऱ्हाड) येथील आकाश दिलीप शिर्के याच्‍यावर शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे.

सातारा शहरातील एक युवती एका महाविद्यालयात शिकत होती. शिकत असताना तिची ओळख आकाश शिर्के याच्‍याशी झाली. यानंतर त्‍या युवतीसह तिच्‍या इतर मैत्रिणींनी शिर्के याच्‍याकडून फोटोसेशन केले होते. यानंतर काही कारणास्‍तव शिर्के व त्‍या युवतीच्‍यात दुरावा निर्माण झाला.

यामुळे शिर्केने युवतीस धमकावत फोटो व्‍हायरल करण्‍याची धमकी दिली. याच काळात त्‍याने युवतीचे फोटो तिच्‍या नातेवाइकांना व्‍हॉटसॲपवर पाठवले. यानंतरही प्रतिसाद न दिल्‍याने आकाशने इन्‍स्‍टाग्रामवर बनावट अकाउंट ओपन करत त्‍यावरून युवतीचे फोटो व्‍हायरल करत ते तिच्‍या नातेवाइकांना पाठवले. हा प्रकार लक्षात आल्‍यानंतर याची तक्रार आज युवतीने शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात नोंदवली. यानुसार शिर्केवर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!