मंदिर उघडी ठेवून गर्दी जमवल्याप्रकरणी 9 जणांवर गुन्हा


 

स्थैर्य, सातारा, दि. 26 : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर  धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे सर्व सामान्यांसाठी बंद राहतील, असे प्रशासनाचे आदेश असूनही सातार्‍यातील पंचपाळी हौद येथील दुर्गामाता मंदीर उघडून लोकांची गर्दी जमवल्याप्रकरणी 9 जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत माहिती अशी, दि. 25 रोजी सकाळी सहाच्या सुमारास शाहूपुरी पोलिस पेट्रोलिंग करत असता राजवाडा परिसरातून स्पिकरचा आवाज येत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याठिकाणी जावून माहिती घेतली असता पंचपाळी हौद येथील दुर्गामाता मंदिरात ट्रस्टी आणि सदस्यांनी स्पीकर लावून लोकांची गर्दी जमवली असल्याचे निदर्शनास आले. जिल्हाधिकारी यांनी सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे सर्व सामान्यांसाठी बंद राहतील, असे आदेश पारित केले असूनही दुर्गामाता मंदिर उघडे ठेवून व लाऊडस्पीकर लावून व लोकांची गर्दी जमवून कोविड विषाणुचा संसर्ग होवू नये, याची कोणतीही खबरदारी न घेता लोकांचे आरोग्य धोक्यात येईल, असे कृत्य केल्याचे निदर्शनास आले. 

याप्रकरणी पोलिसांनी दुर्गामाता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय लक्ष्मण देशमुख रा. रविवार पेठ सातारा, चैतन्य जनार्दन पवार, रा. क्षेत्रमाहुली, ता. सातारा, विशाल दिलीप पवार रा. भवानी पेठ सातारा, प्रेमचंद रामचंद्र पालकर, रा. सदाशिव पेठ सातारा, हरिष विलास साळुखे रा. 622 गुरुवार पेठ सातारा, राजेंद्र रामचंद्र साळुंखे, रा. गुरुवार पेठ बुरुड गल्ली सातारा, शिवाजी वसंतराव भोसले, यलाप्पा नाना पाटील, शंतनू शरद देशमुख रविवार पेठ सातारा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पो. ना. काशिद तपास करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!