स्थैर्य, सातारा, दि. १८: कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचा आदेश धाब्यावर बसवून विनाकारण फिरणार्या सहाजणांवर तर केरसुणीचे दुकान सुरू ठेवल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात कोवीड-19ची दुसरी लाट वेगाने पसरत असल्याने जिल्ह्यात संचारबंदी करण्यात आली आहे. मात्र, अनेकजण संचारबंदीचा आदेश मोडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहेत. शनिवारी सातार्यातील राजवाडा येथील चौपाटीजवळ काही इसम विनाकारण फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी त्याठिकाणी जावून खातरजमा केली असता रफीक कादर शेख वय -35 वर्षे रा. शनिवार पेठ सातारा, स्वप्नील शिवाजी आवारे वय 35 रा. गुलमोहर कॉलनी शाहुपुरी हे दोघेजण आढळून आले. पोलिसांनी दोघांवरही आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, मोती चौकात काहीजण विनाकारण फिरत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी रवी दिपक देशपांडे वय -45 वर्षे रा. चिमणपुरापेठ सातारा, स्वाती संतोष भोसले वय 37, स्नेहा संतोष भोसले, अक्षय प्रकाश भोसले वय -21 वर्षे रा. निहालनगर सैदापुर, ता. सातारा यांच्यावरही शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कला आहे.
याशिवाय 11.30च्या सुमारास जुना मोटार स्टॅण्ड भाजी मंडई येथे जनार्दन साळंखे केरसुणी नावाचे दुकान सुरू असल्याचे दिसले. अत्यावश्यक सेवेमध्ये असणार्या आस्थापनाच सुरू ठेवण्याचे आदेश असल्याचा आदेश मोडून केरसुणीचे दुकान सुरू ठेवल्याप्रकरणी राम जनार्दन साळुंखे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.