दैनिक स्थैर्य । दि. १८ जून २०२२ । म्हसवड । जिल्हा पोलिस प्रमुख व महसूल विभागाने माण तालुक्यातील वरकुटे म्हसवड येथील माणगंगा नदीपात्रात गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी शुक्रवारी पहाटे चारच्या दरम्यान मोठी कारवाई करत एक पोकलेन, दोन जेसीबी, दोन ट्रॅक्टर एक डंपर यांचेवर जप्तीची कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहा ड्रायव्हर यांच्यावर गुन्हे दाखल करत सर्व वाहने म्हसवड पोलिस स्टेशन येथे जमा करण्यात आली आहेत. पहाटे झालेल्या कारवाईची शुक्रवारी रात्री उशीरापर्यत म्हसवड पोलिस या घटनेचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, मोठ्या कारवाईमुळे चोरटी वाळू उत्खनन करणार्याचे धाबे दणाणले.
दरम्यान माणचे तहसीलदार सुर्यकांत येवले यांनी दिलेली माहिती अशी, माण तालुक्यात माणगंगा नदी पात्रात वाळू चोरी होत असल्याच्या संशयावरून जिल्हा पोलीस प्रमुख व महसूल विभाग यांच्या गौण खनिज उत्खनन व चोरटी वाहतुकीसाठी नेमलेल्या भरारी पथकाने आज शुक्रवारी पहाटे जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक यांचे पथकाने उपविभागीय पोलिस अधीक्षक माण खटाव, तहसीलदार दहिवडी, म्हसवड, मार्डी सर्कल व तलाठी यांनी शुक्रवारी पहाटे चारच्या दरम्यान वरकुटे येथील माणगंगा नदी पात्रात दोन जेसीबी, एका पोकलेन यांचे सहाय्याने दोन ट्रॅक्टर एक डंपरमध्ये चोरुन वाळूचे उत्खनन करुन वाहतूक करत असल्याने त्यांचेवर कारवाई करत सर्व वाहने जप्त करण्यात येवून वाळू भरणाऱ्या मजूरांना हि दुपार पर्यंत सोडण्यात आले नव्हते. त्यांची व जप्त केलेल्या वाहनांच्या ड्रायव्हर यांची चौकशी सुरु होती अखेर पोकलेन ड्रायव्हर चालक कृष्णा बळीराम चोरमले रा. बीड, दुसऱ्या पोकलेन चालक डेगलाल भुवनेश्वर राणा रा. बारशिंग बरगहटा हजारीबाग झारखंड ट्रॅक्टर चालक भैय्या मधुकर चव्हाण, रा. वरकुटे म्हसवड, नामदेव गुलाब शिंदे रा. ढाकणी यांचे विरोधात ३७९,३४ व (८) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनिनियमा खाली गुन्हे दाखल करण्यात आले.
दरम्यान, याबाबत फिर्याद मार्डी मंडल अधिकारी सुनील खेडेकर यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. कारवाई मध्ये वाकी, मार्डी, दहिवडी, गोंदवले, पळशी वर. तलाठी व मंडल अधिकारी यांनी कारवाई मध्ये सहभाग घेतला.