स्थैर्य, सातारा, दि. ३० : घराचे बांधकाम सुरु असताना ठेकेदार व मजुरांची बांधकाम ठिकाणी राहण्याची सोय न करता, त्या ठिकाणी येण्याजाण्याची परवानगी नसताना बांधकाम सुरु ठेवून जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाचा भंग केल्याने 13 जणांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. 28 रोजी 11.15 वाजता यशवंत कॉलनी, देवी कॉलनी, सातारा येथे मनीषा चंद्रवीर होनराव (वय 50, रा. प्लॉट नंबर 24, देवी कॉलनी, सातारा) यांनी नवीन घराच्या स्लॅबचे बांधकाम सुरू ठेवून ठेकेदार व मजुरांची बांधकाम ठिकाणी राहण्याची सोय न करता संबंधितांना बांधकामाच्या ठिकाणी ये-जा करण्याची परवानगी नसताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले.
याप्रकरणी मनीषा होनराव, जयवंत कांतीलाल काटवटे (रा. विसावा नाका, सातारा) सुरेंद्र नंदकुमार भोईटे (कोडोली, ता. सातारा), राकेश लिंगाप्पा तळेकटे, शांताप्पा शरणाप्पा कांबळे, शांताप्पा आलप्पा दोडमने, संतोष गुरप्पा नाटेकर, संतोष सदाशिव हळमने, जयवंत परशु कांबळे, मलकप्पा नाटीकर, नागप्पा शरणाप्पा मजगे, उषा माधव कांबळे, बागप्पा महादेव नदीनकेली या तेरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नवनाथ भीमराव पाटील यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दिली आहे.