स्थैर्य, सातारा, दि. 22 : करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही जिल्हा बंदीचा आदेश लागू असून त्याचे उल्लंघन करत पुणे व मुंबई ते सातारा विनापरवानगी प्रवास करुन आरफळ व मालगाव, (ता.सातारा) येथे आलेल्या 11 जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 ते 17 जून या कालावधीत मालगाव, (ता.सातारा) येथे सचिन प्रकाश ढाणे (रा. पुणे), शामराव जनार्दन दळवी, मंजुळा शामराव दळवी, सचिन शामराव दळवी, अंकिता सचिन दळवी (सर्व रा. धारावी, मुंबई), तसेच संपत पांडुरंग कुंभार, रेखा संपत कुंभार (रा. डोंबवली), फिरोज हमीत शेख, सलमा फिरोज शेख, समीर युसूफ शेख (रा. मुंबई) हे सर्वजण विनापरवानगी आरफळ व मालगाव येथे येवून राहिले होते.
याबाबत सरपंच विलास कदम, पोलीस पाटील रमेश मोझर, ग्रामविकास अधिकारी ए. आर. कुंभार यांनी ते आलेल्या ठिकाणी जावून खात्री केली असता हे सर्वजण विनापरवानगी गावी येवून राहिले होते. त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यास कळवल्यानंतर पोलीस हवालदार महेश कदम यांनी त्यांच्याविरुध्द फिर्याद दिली असून त्यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मोरे करत आहेत.