स्थैर्य, सातारा, दि. २९ : औद्योगिक उत्पादन निर्देशांक परिगणित करण्यासाठी नियमितपणे माहिती प्राप्त व्हावी यासाठी अर्थ व सांख्यिकी विभागामार्फत वेब पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. या वेब पोर्टलचे अनावरण राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते 29 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे, अशी माहिती अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबईचे सह संचालक पू.हि. भगूरकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्यासाठी राज्यस्तरावर औद्योगिक निर्देशांक (पायाभूत वर्ष 2011-12 ) नियोजन विभाग, अर्थ व सांख्यिकी संचालनालय व उद्योग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करुन सुनिश्चित कालावधीप्रमाणे प्रसारित करण्याचे राज्य शासनाने निश्चित कले आहे. औद्योगिक उत्पादन हा देशातील, राज्यातील औद्योगिक प्रगती दर्शविणारे मापन आहे. विविध राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या औद्योगिक क्षेत्राच्या वाढीचा अभ्यास तसेच तुलना करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. औद्योगिक उत्पादन निर्देशांक परिगणित करण्यासाठी नियमितपणे माहिती प्राप्त होण्यासाठी वेब पोर्टलचे अनावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 29 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची ऑनलाईन लिंक htts://Desktopvc.nic.in/flexhtml?roomdirect.html&key=WeAiybBes उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचेही आवाहन सह संचालक श्री. भगूरकर यांनी केले आहे.