स्थैर्य, फलटण : फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही नागरिकांचे कोणतेही प्रश्न सोडवण्यासाठी ‘‘फलटण संवाद‘‘ या ॲपची निर्मिती करण्यात आलेली आहे. यापूर्वीही आम्ही फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध होतो व आताही आहे. आताच्या डिजिटल युगामध्ये कोणत्याही नागरिकांना त्यांच्या घरी बसून कोणतीही तक्रार अथवा समस्या सोडविण्यासाठी ‘‘फलटण संवाद‘‘ या ॲपची निर्मिती करण्यात आलेली आहे. तरी ‘‘फलटण संवाद‘‘ हे ॲप डाऊनलोड करून जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या समस्या व प्रश्न मांडावेत, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केलेले आहे.
विधान परिषदेचे सभापती व फलटणचे अधिपती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून मधून ‘‘फलटण संवाद‘‘ हे ॲप्लिकेशन तयार करण्यात आलेले आहे.
आताच्या डिजिटल युगामध्ये कोणत्याही नागरिकांना कोठूनही आपली समस्या थेट मांडण्यासाठी ‘‘फलटण संवाद‘‘ हे ॲप्लिकेशन तयार करण्यात आलेले आहे. तरी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघातील सर्व नागरिकांनी ‘‘फलटण संवाद‘‘ हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून आपले प्रश्न थेट मांडावेत, असे ही सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही ग्रामपंचायत अथवा नगरपरिषदेपासून ते थेट राज्याच्या मंत्रालयापर्यंत सर्वसामान्य नागरिकांचे कोणतेही प्रश्न अथवा कोणतीही समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यासाठीच आताच्या डिजीटल युगामध्ये डिजिटली प्रश्न व समस्या मांडण्यासाठी ‘‘फलटण संवाद‘‘ हे ॲप्लिकेशन तयार करण्यात आलेले आहे. तरी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघातील सर्व नागरिकांनी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये घ्यावे व आगामी काळात जर आपल्याला कोणती समस्या अथवा आपल्याला कोणता प्रश्न विचारायचा असेल तर तो थेट ‘‘फलटण संवाद‘‘ ॲप्लिकेशन द्वारे कळविण्यात यावा, असेही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.