दैनिक स्थैर्य | दि. ४ डिसेंबर २०२४ | फलटण |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय, फलटण येथील कृषिदूतांनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमाअंतर्गत रावडी बु., ता. फलटण येथे शेतकर्यांच्या कृषी संवाद मंचाची निर्मिती केली.
गावातील शेतकर्यांना व्हॉट्सअॅप या सोशल मीडियावर ग्रुप तयार करून, या ग्रुपअंतर्गत पीक उत्पादन, रोग व किडींचे निवारण, सरकारी योजनेचा प्रसार, प्रगतशील शेतकर्यांची यशोगाथा, शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान, शेतीच्या निगडित समस्यांची निवारणबद्ध माहिती प्रसारित केली गेली.
या कार्यक्रमाला सरपंच दिलीप ताकवले, सुमित भंडलकर, अक्षय मदने, गणेश भंडलकर, प्रवीण जाधव, संजय ढगे, विकास जगदाळे, रामदास सूळ, दिलीप मोटे, महादेव कोळी, विजय ताकवले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम, समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत जगताप प्रजोत, कदम रोहन, गौंड अनिकेत, गरगडे प्रणव, गोलांडे तुषार, गुरव ओंकार, सार्थक शेंडगे यांनी हा उपक्रम पार पडला.