दैनिक स्थैर्य । दि. १६ मार्च २०२२ । मुंबई । डोटा २ आणि लीग ऑफ लीजेण्ड्स यासारख्या थरारक एमओबीए गेम्सचा भारतामध्ये मोठा युजरवर्ग आहे. भारतीय गेमर्स नियमितपणे त्यांच्या पीसीवर हे गेम्स खेळतात. क्लॅश ऑफ टायटन्स पहिल्यांदाच भारतीय गेमर्सना मोबाइल फोन्सवर डायनॅमिक एमओबीए गेम-प्ले अनुभव देतो आणि खेळाडूंना कुठेही, कधीही गेम खेळण्याचा आनंद देतो. क्लॅश ऑफ टायटन्स २३ डिसेंबर २०२१ रोजी अँड्रॉइड व्यासपीठावर आणि ६ जानेवारी २०२२ रोजी आयओएसवर सादर करण्यात आला.
क्लॅश ऑफ टायटन्स हा मोबाइल डिवाईसेससाठी विकसित करण्यात आलेला भारताचा पहिला मल्टीप्लेअर ऑनलाइन बॅटल एरिना (एमओबीए) गेम आहे. भारताची व्यापक मोबाइल गेमिंग बाजारपेठ पाहता हा गेम अँड्रॉइड व आयओएस व्यासपीठांसाठी विकसित करण्यात आला आहे.
एमओबीए गेम्स हे अत्यंत रोमांचक, अटीतटीचे, योजनेवर आधारित असतात, जिथे खेळाडूंच्या दोन टीम्स पूर्वनिश्चित युद्धाच्या मैदानात एकमेकांशी स्पर्धा करतात. यातील स्पर्धकाची बाजू कोणती आहे त्यानुसार त्याचे मूळ उद्दिष्ट ठरते. ते आहे विरोधकाच्या मैदानाच्या विरूद्ध दिशेला उभ्या असलेल्या मुख्य तळाला नष्ट करणे. या गेमची रचना अशा रितीने करण्यात आली आहे की खेळाडू आपल्या मोबाइल/ हँडहेल्ड साधनावरील फक्त दोन बटणांचा वापर करून आपले योद्धे नियंत्रित करतो आणि लढाईत सामील होऊ शकतो.
या क्लासिक ५व्ही५ एमओबीए गेममध्ये युजर्स अनेक टायटन्स व पोशाखांसह रिअल-टाइम युद्धाचा आनंद घेऊ शकतात. प्रत्त्येक युजर त्यांचे मेगा किल मिळवत त्यांचे नशीबवान टायटन व भूमिकांचा शोध घेऊ शकतात.
‘टायटन्स’ हे योद्धे असून त्यांचा वापर खेळाडूंना या अत्यंत रोमहर्षक एमओबीए युद्धांमध्ये करता येतो. गेममध्ये विविध प्रकारच्या खेळाडूंच्या भूमिका वर्गीकृत केलेल्या आहेत. प्रत्येक टायटनमध्ये स्वतःच्या विशेष क्षमता आहेत आणि त्यांचा वापर प्रतिस्पर्धींवर अत्यंत बारीकपणे नियोजित हल्ल्यांसाठी केला जाऊ शकतो. या गेमच्या सखोल टायटन रोस्टरमध्ये अत्यंत विश्वासू रणगाडे, लढाऊ योद्धे, प्राणघातक हल्ले, खिळवून ठेवणारी शस्त्रे, पद्धतशीर काम करणारे मार्क्समॅन आणि प्रोअॅक्टिव्ह सपोर्ट टायटन्स आहेत. खेळाडू त्यांच्या टायटन्सना सानुकूल करत युद्धासाठी सुसज्ज देखील करू शकतात.
खेळाडू कधीही, कुठेही मित्रांचा समूह तयार करू शकतात आणि नवीन मित्रांना ऑनलाइन भेटू शकतात, ज्यांच्यासोबत ते समूह तयार करून सर्वोत्तम गेमप्ले अनुभवाचा आनंद घेऊ शकतात. दररोज लॉग इन करणा-या गेमर्सना मोफत टायटन्स आणि इतर आकर्षक ऑफर्ससह पुरस्कारित करण्यात येते.
या गेमची रचना अशा रितीने करण्यात आली आहे की, खेळाडू आपल्या मोबाइल/ हँडहेल्ड साधनावरील फक्त दोन बटणांचा वापर करत आपले योद्धे नियंत्रित करतो आणि लढाईत सामील होऊ शकतो. क्लॅश ऑफ टायटन्स भारतामध्ये एमओबीए गेमिंगच्या वाढत्या लोकप्रियतेसाठी उत्प्रेरक ठरेल. दर आठवड्याला नवीन टायटन लाँच करण्यात येईल. यामुळे टायटन समूह निर्माण करणारे क्लॅश ऑफ टायटन्स समूहामध्ये अधिक उत्साहित होतील.