दैनिक स्थैर्य । दि.०४ एप्रिल २०२२ । सातारा । सातारा शहरातील रहदारीस अडथळा निर्माण करणारी तसेच नो-पार्किंग मध्ये लावलेली वाहने, अपघातग्रस्त वाहने, बेवारस वाहने क्रेनच्या (टो-गाडी) सहाय्याने टोईंग करण्यासाठी दोन क्रेन भाडेतत्वार शर्ती व अटींचा करार 11 महिन्यांकरिता करुन कार्यरत ठेवण्यात येणार आहे. शर्ती व अटींबाबतची माहिती वाहतुक नियंत्रण शाखा सातारा शहर कार्यालयात उपलब्ध आहे. जे क्रेन मालक आपले स्वत:चे मालकीचे वाहन शर्ती व अटींचा करार करुन कार्यरत ठेवण्यास इच्छुक आहेत. त्यांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या नियमानुसार क्रेनची (टो-गाडी) ची कागदपत्रे सुस्थितीत असल्याबाबतचे योग्य ते प्रमाणपत्रासह आपली दरपत्रके दि. 11 एप्रिल 2022 पर्यंत सकाळी 11 वा. पर्यंत समक्ष सादर करावीत असे, सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. ए. शेलार यांनी कळविले आहे.