
दैनिक स्थैर्य । 17 मे 2025। सातारा। ढगांच्या गडगडाटात वळवाच्या पावसाने चांगलीच हजेरी लावली. फलटण तालुक्यात दोन ठिकाणी वीज कोसळली. एके ठिकाणी नाराळाच्या झाडाने पेट घेतला. तर कापडगावला वीज पडल्याने गाय जागीच ठार झाली. सातार्यासह तालुक्यात शुक्रवारी सकाळी एक तासभर जोरदार हजेरी लावली. यामुळे सखल भागात पाणी साचले. दरम्यान, सातारा तालुक्यातील वर्ये, लिंबखिंड परिसरात चांगला पाऊस झाला.
जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. तापमानातही मोठ्या प्रमाणात उतार आला आहे. त्याचबरोबर ढगाळ वातावरण तयार होत होते. त्यातच जिल्ह्यातील काही भागात पाऊसही झाला. पण, शुक्रवारी सकाळपासूनच जिल्ह्यात आभाळ भरुन आले होते. यामुळे काही भागात पाऊस पडला. सातारा शहरासह तालुक्यात तर सकाळी 11 पासूनच पावसाचे थेंब पडू लागले. त्यानंतर साडे आकरा वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरूवात झाली. ढगांच्या गडगडाटात पाऊस पडत होता.अर्धा तास जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले. तरीही रिपरिप सुरूच होती. त्यामुळे दुपारी पाऊस एकदम कमी होत गेला. या पावसामुळे सातारा शहरातील सखल भागात पाणी साचले. त्यामुळे दुकानमालकांची तारांबळ उडाली.
सातारा शहरात संभाजी महाराजांचे जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमातमधील संयोजकांची ही या पावसाने धांदल उडवली तसेच कास, बामणोली ठोसेघर या परिसरातून रानमेवा विक्रीला आणलेल्या विक्रेत्यांना या पावसापासून बचावासाठी 68 शोधावा लागला. सातार्यात सुरू होणार्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आयोजनातही या पावसामुळे थोडा व्यक्त आणला त्यामुळे संयोजकांमध्ये थोडी नाराजी दिसून आली राज्य स्पर्धेच्या मैदानाची आखणी करता शिवाजी उदय मंडळाच्या मैदानावर संयोजकांनी विशेष परिश्रम घेत सायंकाळी व रात्री उशिरापर्यंत या मैदानाची आखणी करण्याचे काम केले.