
स्थैर्य, वाई, दि.५: अज्ञात शिकाऱ्यांनी वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी पेरलेल्या बॉंबचा स्फोट होऊन पाळीव गाईचा जागीच मृत्यू झाला. जायगाव (ता कोरेगाव) येथे ही घटना घडली. गायीच्या मालकाने गाय शेतामध्ये चरण्यासाठी सोडलेली असताना गावात वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी गावातील शिकार्यांनी पेरलेल्या बॉम्बचा बॉम्बस्फोट गायीच्या तोंडात झाला त्यामुळे गंभीर जखमी होऊन गायीचा मृत्यू झाला. याप्रकरणी वनविभागाकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे. संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली