दैनिक स्थैर्य । दि. १४ जुलै २०२१ । फलटण । येथील महाराजा मोलोजीराव सिल्व्हर ज्युबली हॉस्पिटल संचलित फलटण लाईलाईन हॉस्पिटलमध्ये कोरोना प्रतिबंधक कोव्हीशिल्ड ही लस दि. २२ व २३ जुलै २०२१ रोजी लसीकरणासाठी उपलब्ध राहणार असल्याची माहिती फलटण लाईफलाईन हॉस्पिटलचे डॉ. प्राश्वनाथ राजवैद्य यांनी दिली.
दि. २२ व २३ जुलै २०२१ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत लसीकरण सुरू राहणार असुन लसीकरणासाठी पुर्व नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी प्रथम पैसे भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. लसीकरणाच्या नोंदणीसाठी सुनील फलके (मोबा.: ९६९७४४९६९७) यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आलेले आहे.