कोव्हिड – १९च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सोन्याच्या दरात वाढ


 

स्थैर्य, मुंबई, दि. १२: कोरोना विषाणूच्या दुस- या लाटेच्या चिंतेने गुंतवणूकदार सुरक्षित मालमत्तेचे साधन म्हणून सोन्याकडे आकर्षित होत आहेत. परिणामी स्पॉट गोल्डच्या दरांना आधार मिळाला. विषाणूच्या धोकादायक वाढीमुळे कच्चे तेल आणि बेस मेटलच्या दरांवर दबाव आला. मात्र अमेरिकेच्या डॉलरचे मूल्य सुधारल्याने सोने तसेच औद्योगिक धातूंच्या दरांवर परिणाम होऊ शकतो असे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी व्यक्त केले. 

सोने: अमेरिकेकडून आणखी मदत मिळण्याच्या आशेने सोन्याचे दर १.६% नी वाढले. कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत जगभरात वाढ झाल्याने सोन्याचे दर आणखी वाढण्यास मदत झाली. आणखी मदतीच्या उपाययोजनांवरील बैठक राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थगित केली. अमेरिकेच्या प्रवासी विमान कंपन्यांच्या मदतीसाठी नव्या वेतनपटाकरिता त्यांनी २५ अब्ज डॉलरचा निधी देण्याचे त्यांनी काँग्रेसला म्हटले. हजारो कर्मचा-यांच्या नोक-या वाचवण्यासाठी ही मदत मागण्यात आली. अतिरिक्त कोरोना विषाणू मदत निधीमुळे सोन्याला आधार मिळाला. महागाई आणि चलन अवमूल्यन रोखण्यात सोन्याच्या व्यवहारांची मदत होते.

सप्टेंबर २०२० मध्ये चीनमधील औद्योगिक कामकाज मोठ्या प्रमाणावर वाढले. यामुळे विदेशी मागणीत वाढ झाली, गुंतवणुकदारांची जोखिमीची भूक वाढली आणि सोन्यातील नफ्यावर मर्यादा आल्या. तथापि, डॉलरचे मूल्य सुधारल्याने सोन्याचे दर कमी होऊ शकतात.

कच्चे तेल: पुरवठ्यातील कमतरतेमुळे डब्ल्यूटीआय क्रूडचे दर मागील आठवड्यात ८.९% नी वाढले. तसेच अमेरिका समर्थित वाढीव मदतीच्या आशेने तेलाच्या दरांना आधार मिळाला. युनियन आणि नॉर्वेयन तेल व वायू असोसिशनदरम्यानच्या अपयशी चर्चेमुळे आंदोलनाला बळ मिळाले. परिणामी सिक्स नॉर्वेयन ऑफशोअर ऑइल व गॅस फील्ड बंद राहिले. यामुळे कच्च्या तेलाच्या दरांना आधार मिळाला.

अमेरिकी खाडी किनाऱ्यावर डेल्टा चक्रिवादळ आल्याने एकूण क्रूड उत्पादनात १७ टक्के योगदान देणा-या उर्जा कंपन्या नुकसानीच्या भीतीपोटी बंद ठेवल्या गेल्या. परिणामी तेलाच्या दरांना आधार मिळाला. तथापि, वादळच्या चिंता काहीशी कमी झाल्याने अमेरिकी तेल उत्पादनात सुधारणा झाली तर तेलाचे दर आणखी घसरू शकतात. २ ऑक्टोबर २०२० रोजी संपलेल्या आठवड्यात अमेरिकी तेलसाठ्यात ५०१,००० बॅरल्सने वाढ झाली. कोव्हिड-१९च्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने तसेच प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये पुन्हा लॉकडाऊन सुरु झाल्याने कच्च्या तेलाच्या अर्थकारणावर दबाव आला.

बेस मेटल्स: चीनकडून मागणी वाढल्याने मागील आठवड्यात बेस मेटलचे दर एलएमईवर हिरव्या रंगात स्थिरावले. तसेच अमेरिकेच्या अतिरिक्त मदत पुरवठ्याच्या आशेमुळेही औद्योगिक धातूंच्या दरांना आधार मिळाला. सप्टेंबर २०२० मध्ये चीनच्या औद्योगिक कामकाजात वेगाने वाढ झाल्याने औद्योगिक धातूंच्या दरांना आधार मिळाला. तथापि, जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमधील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या चिंतेमुळे तसेच चीनच्या सप्ताह सुटीमुळे धातूच्या किंमतीबाबत खबरदारी बाळगली गेली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!