कोव्हिड – १९ रुग्णांमध्ये पुन्हा वाढ झाल्याने सोन्याला आधार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.५: कोव्हिड-१९ च्या दुस-या लाटेमुळे निर्माण झालेल्या चिंतेने गुंतवणूकदार सुरक्षित मालमत्ता समजल्या जाणा-या सोन्याकडे आकर्षित झाले. तर कच्चे तेल आणि बेस मेटलची मागणी घटली. कमकुवत आर्थिक दृष्टीकोनामुळेही कच्च्या तेलाचे दर आणखी दबावाखाली आहे. कोव्हिड-१९ च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चीनच्या मजबूत आर्थिक आकडेवारीने कोव्हिड-१९ च्या रुग्णवाढीवर पांघरुण घातले. त्यामुळे बेस मेटलमधील नफा मर्यादित राहिला असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

सोने: अमेरिकेकडून आणखी प्रोत्साहनपर मदत मिळण्याच्या आशेने स्पॉट गोल्डचे दरात १.१३% नी वाढ झाली. कोव्हिड-१९ च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सोन्यासारख्या सुरक्षित मालमत्तेकडील आकर्षण अधिक वाढले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे डेमोक्रेटिक प्रतिस्पर्धी जो बिडेन यांच्यादरम्यान अध्यक्षीय चर्चेमध्ये मोठा वाद झाला. त्यामळे गुंतवणूकदारांना अमेरिकन डॉलरचा आश्रय घ्यावा लागला. मागील ४ वर्षात अमेरिकी डॉलरने सर्वात कमी मूल्याचा महिना अनुभवल्याने डॉलरचे वर्चस्व असलेल्या सोन्याने दबाव अनुभवला.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असल्याच्या वृत्तानंतर पिवळ्या धातूची मागणी घटली. तथापि, नव्या रुग्णांच्या धोकादायक वाढीमुळे सोन्याच्या किंमतींना आधार मिळाला.

कच्चे तेल: कोव्हिड-१९ विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे गुंतवणूकदारांमधील क्रूडच्या मागणीवर परिणाम झाला. या चिंतेमुळे मागील आठवड्यात डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ८ टक्क्यांनी घसरले. कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येतील वाढीमुळे जागतिक तेल बाजारात मोठी घसरण होणे सुरुच आहे. जगाच्या अनेक प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीवर आणखी दबाव आला. घटत्या मागणीला सामोरे जाण्यासाठी जानेवारी २०२१पासून ओपेक तेलाचे उत्पादन वाढवण्याचे नाकारत आहे. मात्र ओपेकच्या उत्पादन कपातीनंतरही लिबिया आणि इराणमधील निर्यात वाढल्याने

द्रवरुपी सोन्याच्या दरात कपात दिसून आली. तथापि, अमेरिकेकडून आणखी मदत मिळण्याच्या आशेने कच्च्या तेलाच्या दर घसरणीवर मर्यादा येऊ शकतात.

बेस मेटल्स: मागील आठवड्यात अमेरिका आणि चीनने मजबूत आर्थिक आकडेवारी दर्शवल्याने एलएमईवरील बेस मेटलने हिरव्या रंगात विश्रांती घेतली. तथापि, कोव्हिड-१९च्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने तसेच मागणी घटल्याने किंमतीबाबत बाजाराने सावधगिरी बाळगली आहे. मार्च २०२० नंतर चीनची मजबूत आर्थिक सुधारणा आणि जागतिक मध्यवर्ती बँकेच्या प्रोत्साहनपर उपाययोजनांमुळे बेस मेटलचे दर घसरणीनंतर सुधारले. तथापि, जागतिक आर्थिक सुधारणेच्या निश्चित संकेतांअभावी औद्योगिक धातूंच्या दरांवर बाजाराचे बारकाईने लक्ष आहे. 

तांबे: चीनच्या कारखान्यातील कामकाज वाढल्याने एलएमई कॉपरचे दर ०.४५ टक्क्यांनी वाढले व ते ६५५३ डॉलर प्रति टनांवर स्थिरावले. मात्र एलएमई कॉपर साठ्यात वाढ झाल्याने एलएमई कॉपरच्या दरातील वाढ ही मर्यादित राहिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!