फलटण मधील कोविड केअर सेंटर (सीसीसी) सुरु : प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप; ऑक्सिजन बेड्ससाठी दानशूरांकडून मदतीचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. ०८ : कोरोना संक्रमणाचा वेग प्रचंड वाढल्यानंतर प्रशासनाने जाधववाडी येथील समाज कल्याण विभागाच्या बॉईज हॉस्टेलसह दत्तनगर येथील स्व. हणमंतराव पवार विद्यालयामध्ये पुन्हा एकदा कोविड केअर सेंटर (सीसीसी) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जाधववाडी येथील समाज कल्याण विभागाच्या गर्ल्स हॉस्टेल मध्ये ४० बेड्सचे कोविड केअर सेंटर (सीसीसी) सुरु आहे. परंतु तेथे आता बेड्स शिल्लक नसल्याने बॉईज हॉस्टेलसह स्व. हणमंतराव पवार विद्यालयामध्ये कोविड केअर सेंटर (सीसीसी) सुरु करणार आहे. या सोबतच शिंगणापूर रोड येथील गर्ल्स हॉस्टेल मध्ये ऑक्सिजन युक्त बेड्स तयार करायचे आहेत. त्या साठी दानशूर मंडळींनी पुढे येऊन ऑक्सिजन बेड्स उभे करावेत असे आवाहन फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केलेले आहे.

काल दि. ०८ एप्रिल अखेर फलटण तालुक्यामध्ये ९०० ऍक्टिव्ह रुग्ण असून त्या पैकी ७२१ रुग्ण होम आयसोलेशन मध्ये उपचार घेत आहेत तर १७९ रुग्ण हे उपजिल्हा रुग्णालय, कोविड केअर सेंटर (सीसीसी), खाजगी दवाखाने येथे उपचार घेत आहेत. फलटण तालुक्यामध्ये दि. ०८ एप्रिल अखेर ७९१८ कोरोनाबाधित रुग्ण झालेले आहेत तर १८० रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागलेला आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. व्ही. पोटे यांनी दिली.

प्रशासनाला कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना प्रशासनाच्या वतीने केल्या जात होत्या. सध्या सुरु असलेल्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहायेथील कोविड केअर सेंटरमध्ये ८० रुग्णांची क्षमता आहे. सद्यस्थितीत येथील ४० बेड भरलेले आहेत. फलटण तालुक्यातील आरोग्य विभागावर येणाऱ्या अतिरिक्त कामाच्या ताणामुळे शिक्षक, अंगणवाडी सेविकांची मदत या पुढे घ्यावी लागणार आहे. गेल्या वर्षी कोरोना संक्रमण काळात सीसीसीमध्ये सेवा देणाऱ्यांना पुन्हा बोलविले जाणार असल्याचेही बोलले जात आहे.


Back to top button
Don`t copy text!