स्थैर्य, मुंबई, दि.२३:युरोप आणि उत्तर अमेरिकेतील कोरोना
विषाणू रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ तसेच नव्याने लॉकडाऊनच्या चिंतेने कच्चे तेल आणि
तांब्याच्या दरातील नफा मर्यादित राहिला. तसेच पिवळ्या धातूला आधार मिळाला. अतिरिक्त
उत्पादन तसेच जागतिक मागणीतील निराशेने तेलाचे दर घसरले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन
संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
सोने:अमेरिकेच्या अतिरिक्त मदत पॅकेजच्या अनिश्चिततेमुशे सोन्याचे दर १.०६ टक्क्यांनी घसरले
व ते १,९०४ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. दरम्यान, अमेरिकेच्या रोजगाराची आकडेवारी
अपेक्षेपेक्षा चांगली आल्याने सोन्याचे दर घसरण्यात मदत झाली. अमेरिरकन हाऊस स्पीकर
नँसी पेलोसी आणि ट्रेझरी सेक्रेटरी स्टिव्ह म्युचिन यांनी दोन्ही पक्षातील दरी भरून
काढण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. नव्या कोरोना मदत विधेयकावर हालचाल न केल्याचा
आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅट्सवर केला. अमेरिकी डॉलरचे मूल्य
सुधारल्याने पिळ्या धातूच्या आकर्षणावर परिणाम झाला.
तथापि, युरोपमध्ये
विषाणूमुळे झालेले लॉकडाऊन आणि जगभरात कोरोना रुग्णसंख्येने ४१.७ दशलक्षांचा आकडा पार
केल्याने सुरक्षित मालमत्ता अशलेल्या सोन्याची मागणी वाढली. अमेरिकेकडून अध्यक्षपदाच्या
निवडणुकीपूर्वी अतिरिक्त मदतीचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याने सोन्याचे दर घसरू शकतात.
कच्चे
तेल:साथीच्या आजाराचा विळखा वाढतच राहिला तर उत्पादन कपात आणखी वाढवणार असल्याचे रशियाचे
अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले. त्यामुळे डब्ल्यूटीआय क्रूडचे दर १.५३ टक्क्यांनी
वाढले व ४०.६ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. उत्पादन कपातीमुळे तेलाला काहीसा आधार मिळेल.
युरोप व उत्तर अमेरिकेतील विषाणू प्रसार व लॉकडाऊन स्थइतीमुळे तेलाच्या अर्थकारणावर
परिणाम होऊन दरांवर आणखी दबाव आला आहे.
एनर्जी इन्फॉर्मेशन
अॅडमिनिस्ट्रेशनच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेच्या पेट्रोलसाठ्याची पातळी ११.९ दशलक्ष
बॅरलपर्यंत वाढली असून बाजारपेठेच्या अपेक्षेच्या तुलनेत म्हणजेच, १.८ दशलक्ष बॅरलच्या
तुलनेत कमी आहे. तेलाच्या मागणीतही घट कायम आहे. लिबियातील क्रूड उत्पादनातही वाढ झाली
असून सर्वात मोठे तेलक्षेत्र शरारा येथे पुन्हा उत्पादन सुरु झाल्याने तसेच मागणीतील
उदासीनतेने तेलातील नफ्यावर मर्यादा आल्या. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेची चिंता
आणि लिबियातील उत्पादन वाढीमुळे नफ्याबाबत साशंकता आहे.