‘कोविड-१९ मदत आयात माल’ दानदात्यांच्या सुविधांसाठी महाराष्ट्रात ‘नोडल अधिकारी’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. ०५: राज्यात कोविड-19 या आजाराचा प्रसार होत असतानाच, राज्य शासन व त्यांच्या संलग्न संस्था तसेच राज्य शासनाच्या अधिकृत संस्था किंवा वैधानिक संस्था यासाठी मदत पुरविण्याचे कार्य करीत आहेत. यासाठी बाहेरील देशातून कोविड-19 साठी मदत साहित्य पाठविण्यात येत आहे. विनामूल्य आयात केलेल्या मदत कार्याचा अखंड प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी राज्य शासनाने उद्योग विकास आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.

‘कोविड-19 रिलिफ आयटम’ सवलतीच्या उद्देशाने विनामूल्य आयातीची सोय करत असल्यास, त्यांना परदेशातून आयात केलेल्या विशिष्ट कोविड -19 मदत साहित्याच्या आयातीवर आयजीएसटीची सवलत केंद्र शासनाने जाहीर केली आहे.

प्रशासकीय पुढाकाराचा जास्तीत जास्त परिणाम घडविण्यासाठी आणि कोविड दरम्यान त्रास कमी करण्यासाठी, उद्योग विकास आयुक्त यांना नियुक्त करण्यात आले आहे. नोडल अधिकारी यांचा संपर्क क्रमांक – (022) 22028616/22023584 तसेच ई-मेल [email protected] असा आहे.

‘कोविड रिलीफ आयटमच्या’ आयातीसाठी पुढीलप्रमाणे कागदपत्रे सादर केल्यानंतर काही अटींच्या आधारे नोडल अधिकारी सवलत प्रमाणपत्र देतील.


Back to top button
Don`t copy text!