स्थैर्य, मुंबई, दि.१३: सध्याच्या आव्हानात्मक काळात समाजसेवेचा दृष्टीकोन राखणाऱ्या एमजी मोटर इंडियाने कोव्हिड-१९ ने प्रभावित लोकांसाठी क्रेडिहेल्थच्या मदतीने २०० टिकाऊ बेड्स दान केले आहेत. हे बेड्स हार्ड कार्डबोर्ड मटेरियलपासून बनवण्यात आले असून त्यावर वॉटरप्रूफ कोटिंग आहे. ते पूर्णपणे बायोडिग्रेडेबल आहे. एमजी मोटर इंडिया आर्यन पेपर मिल्स कंपनीकडून हे बेड्स खरेदी करेल. २०२० पासून, आर्यन मिल्सने असे टिकाऊ बेड्स इंडियन आर्मी, मुंबई महानगरपालिका, इंडियन नेव्ही आणि इतर काही खासगी संस्थांना पुरवले आहेत.
क्रेडिहेल्थ हा आघाडीचा ऑनलाइन हेल्थकेअर प्लॅटफॉर्म असून तो देशात डॉक्टर आणि हॉस्पिटलच्या शोधात असलेल्या लोकांना याद्वारे मदत केली जाते. क्रेडिहेल्थने नुकतीच असिप्टमॅटिक आणि सौम्य कोव्हिड रुग्णांसाठी कोव्हिड हेल्पलाइन लाँच केली आहे.
एमजी सेवा या सामुदायिक सेवा छत्राअंतर्गत, कारनिर्माता कंपनी अनेक उपक्रम राबवत आहे. एप्रिल २०२१ मध्ये, कंपनीने गुजरातमधील देवानंदन गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी भागीदारी केली. या कंपनीच्या वडोदऱ्यातील एका प्रकल्पात भागीदारीनंतर, ऑक्सिजनची निर्मिती १५ टक्के प्रति तास या वेगाने वाढवण्यात आली. लवकरच ती ५०% पर्यंत नेण्याचा उद्देश आहे. हेक्टर अॅम्ब्युलन्स देशाच्या सेवेतील डॉक्टर्स आणि मेडिकल कर्मचाऱ्यांना मदत करत आहेत. ब्रिटिश वारसा असलेली कारनिर्माता कंपनी लवकरच वडोदऱ्यात हेक्टर मोबाइल टेस्टिंग युनिट देणार आहेत. कारनिर्माता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आयात करत असून याद्वारे कर्मचाऱ्यांच्या कुटुंब सदस्यांना याचे संरक्षण मिळेल. याचवेळी, कर्मचाऱ्यांना मोफत लसीकरण पुरवले जात आहे. डीलरशिपसाठीदेखील या सुविधा पुरवल्या जात आहेत.