सातार्‍यात बोकील मेट्रोपोलिस लॅबोरेटरीमध्ये कोविड-19 अँटिबॉडी चाचणीची सुविधा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. १८ : सध्या सर्वत्र  करोना  ने थैमान घातले असून प्रत्येकजण एकमेकाकडे संशयित नजरेने पाहत आहे. या आजारात जवळपास 80 टक्के लोकांमध्ये विशेष लक्षणे आढळून येत नाहीत (ASYMPTOMATIC) किंवा अत्यंत सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळतात. त्यासाठी आपल्याला  करोना   होवून गेला आहे का किंवा आपल्या शरीरात  करोना   विषाणू विरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे का हे समजून घेण्यासाठी कोविड-19 IgG अँटिबॉडी टेस्ट ही उपयोगाची आहे.  ही सुविधा बोकील मेट्रोपोलिस लॅबमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या चाचणीविषयी अधिक माहिती देताना डॉ. श्रीकांत बोकील म्हणाले, ही चाचणी रक्तातील अँटिबॉडीजवर आधारित आहे. त्यामुळे  करोना  ची लक्षणे आढळल्यानंतर सर्वसाधारण 12 ते 14 दिवसांनी ही चाचणी करावी. या चाचणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह असतील तर घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. ही टेस्ट पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ तुमच्या शरीरात  करोना   विषाणू विरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे असे समजावे. ही चाचणी बोकील मेट्रोपोलिस लॅबोरेटरीमध्ये ABBOTT, HITACHI यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या स्वयंचलित मशिन्सवर CLIA या ICMR APPROVED TECHNIC ने केली जाते. या चाचणीची अचूकता 7 ते 9 दिवसानंतर 91 टक्के, 10 ते 12 दिवसानंतर 95 टक्के व 12 ते 14  दिवसानंतर सर्वसाधारण 99 टक्के इतकी आहे.

सदर चाचणी कोणी करावी याविषयी माहिती देताना डॉ. बोकील म्हणाले,  करोना   पॉझिटिव्ह व्यक्तीच्या निकटवर्तीयांनी, आरोग्य व्यवसायाशी निगडित सर्व व्यक्तींनी, कंटेन्मेंट झोनमधील व्यक्तींनी, औद्योगिक वसाहतीत काम करणार्‍या कामगारांनी, सुरक्षा रक्षक, दुकानदार, बँक कर्मचारी, सर्व वाहनांचे चालक, शासकीय कार्यालयातील कर्मचारी  तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी ही चाचणी करून घ्यावी.

कोविड-19 अँटिबॉडी चाचणी ही मुख्यत: नजीकच्या भूतकाळात तुम्हाला  करोना   होवून गेला आहे का हे समजून घेण्यासाठी आहे. ही तपासणी एखाद्या व्यक्तीस सद्यस्थितीत  करोना    (ACTIVE INFECTION) आहे  किंवा नाही यासाठी नाही. सद्यस्थितीमधील आजार (ACTIVE  INFECTION) समजून घेण्यासाठी  तुम्हाला स्वॅब टेस्ट करणे गरजेचे असते. सध्या बोकील मेट्रोपोलिस लॅबमधून स्वॅब टेस्िंटग करता (RT PCR) त्यांच्या मुंबई, पुणे स्थित मेट्रोपोलिस लॅब येथे पाठवण्याची सुविधा आहे. सदर स्वॅब हे रोजचे रोज पाठवले जात असून सर्वसाधारण पुढील 24 तासात रिपोर्ट उपलब्ध होतात तसेच डॉ. बोकील यांनी RAPID ANTIGEN TEST ही सुविधादेखील सातार्‍यात लवकरच सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!